उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधु विद्याभूषण पुरस्कार प्रदान

उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधु विद्याभूषण पुरस्कार प्रदान

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : – तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलाल राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा चाळीसगाव येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना नाशिक येथील ज्ञानसिंधु प्रकाशन संस्था मार्फत राज्यस्तरीय ज्ञानसिंधु विद्याभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय साहित्य संमेलनात जेष्ठ संत साहित्यिक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. यशवंतराव पाटील, जेष्ठ साहित्यिक तथा रंगकर्मी माधुरी माटे, ज्ञानसिंधु प्रकाशनचे प्रकाशक अध्यक्ष तान्हाजी खोडे व साहित्यिक सुरेश पवार यांच्या हस्ते शाल, बुके, सन्मानपत्र, सन्मानचिह व पुस्तक देवून सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सतीश सूर्यवंशी हे पिंपरखेड तांडा येथील वाडीलाल राठोड माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून गेल्या पंधरा वर्षापासून ते विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना कृतीशील अध्यापन करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. तसेच शाळा, विद्यार्थी, शिक्षक व समाज यांच्या विकासासाठी सदैव अग्रेसर असलेल्या समृध्दी शिक्षक फाउंडेशन तर्फ सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या उपक्रमाचे ज्ञानसिधु प्रकाशन व्दारा प्रकाशित झालेले सेल्फी विथ सक्सेस हे पुस्तक नुकतेच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले. सेल्फी विथ सक्सेस हे पुस्तक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. यशवंतराव पाटील यांना या कार्यक्रमात सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. त्यांनी केलेल्या शिक्षण, साहित्य व सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधु विद्याभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमला जेष्ठ संत साहित्यिक प्रा.डॉ.यशवंतराव पाटील, जेष्ठ साहित्यिक तथा रंगकर्मी माधुरी माटे, साहित्यिक सुरेश पवार, ज्ञानसिंधु प्रकाशनचे प्रकाशक तान्हाजी खोडे , साहेबराव कदम, प्रा.डी.टी. पाटील, ललित साळवे, नियोजन समितीचे सदस्य, जेष्ठ पत्रकार प्रविण नेटावणे आदि मान्यवर उपस्थित होते. सतीश सूर्यवंशी यांचे सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष लोकेनेते जी.जी. चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिद्र राठोड, चिटणीस राजेश वाडीलाल राठोड व कार्यकारी संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें