श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे युवा नेते अमोल रासकर यांच्याकडून शाळकरी मुलांना खाऊ व सायकल वाटप करून उत्साहात साजरा

श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे युवा नेते अमोल रासकर यांच्याकडून शाळकरी मुलांना खाऊ व सायकल वाटप करून उत्साहात साजरा

फलटण प्रतिनिधी :  माननीय श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन निमित्ताने आज सासवड येथे सासवड गावचे युवा नेते युवा उद्योजक श्री अमोल शिवाजीराव रासकर यांच्या वतीने महात्मा फुले हायस्कूल व जुनिअर कॉलेज सासवड येथील विद्यार्थिनींना सायकल देऊन व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
श्री अमोल रासकर यांच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून सासवड गावातील आर्थिक परिस्थिती नाजुक असणाऱ्या गरजु सोळा विद्यार्थी हे सर्व शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेण्यात आलेले असून त्यातील काही दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीना 2-3 किमी वरून शाळेत चालत येत असत त्यामुळे हे लक्षात घेऊन व श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री अमोल रासकर यांनी स्वखर्चाने या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले यावेळेस सासवड गावचे माजी सरपंच श्री पांडुरंग जाधव, श्री मधुकर भुजबळ मा.व्हाईस चेअरमन सासवड विकास सेवा सोसायटी,श्री पंढरीनाथ जाधव माजी सदस्य,श्री आबा खताळ मा. सदस्य,श्री नवनाथ जगताप, श्री संतोष जाधव, जितू काकडे, नवनाथ सुळ, अजित कारंडे, सागर सुळ, सचिन रासकर,चेतन जाधव तसेच ग्रामस्थ आणि महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें