चाळीसगाव येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचे उदघाटन
( *चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव*) :-
शहरातील जुने विमानतळ परिसरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचे काल शुक्रवार दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. समाजप्रबोधन, जनजागृती आणि युवकांमध्ये सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन पाच पाटील आदरणीय प्रा. आर. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजकांना विमलकिर्ती प्रकाशनातर्फे कब्रिड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि प्रा. गौतम निकम लिखित डॉ बाबासाहेच आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ज्ञानदीप हे पुस्तक भेट देण्यात आले. मान्यवरांनी पथनाट्य ही केवळ मनोरंजनाची कला नसून अंधश्रद्धा, अन्याय, पर्यावरण, संविधान जागृती आणि विविध सामाजिक प्रश्नांवर जनतेपर्यंत पोहोचणारे सशक्त माध्यम असल्याचे सांगितले. या तीन दिवसीय शिबिरात अभिनय, संवादकला, दिग्दर्शन, लेखन, समूह सादरीकरण, आवाजातील प्रभाव, तसेच सामाजिक विषयांवर आधारित पथनाट्य सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यास युवक-युवती, नागरिक, कला रसिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे बाताबरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली निकम, संविधान प्रचारक व दिग्दर्शक शंकर यशोद, मांगीलाल मोरे, मनोज नगराळे, भीमाभाई खेद्रे माजी सविता ताई राजपूत, जितेंद्र भाऊ योगेश पाटील, निवृत्ती माळतकर, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थिती होते.












