प्रामाणिकपणाचा आदर्श : बसमध्ये सापडलेले दागिने व रोख रक्कम पोलीसांच्या स्वाधीन करून युवक-युवतीने जपली सामाजिक बांधिलकी 

प्रामाणिकपणाचा आदर्श : बसमध्ये सापडलेले दागिने व रोख रक्कम पोलीसांच्या स्वाधीन करून युवक-युवतीने जपली सामाजिक बांधिलकी 

प्रतिनिधी — सिकंदर शेख 

        बारामती

आजच्या वेगवान आणि स्वार्थी मानल्या जाणाऱ्या युगातही प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपणारी माणसे समाजात आहेत, याचा प्रत्यय बारामती शहरात घडलेल्या एका प्रेरणादायी घटनेतून आला आहे.

सौ. गौरी अनिल दाने (वय २६ वर्षे) व श्री. गौरव आसलकर हे दोघे अहिल्यानगर आगाराची बस क्र. MH 14 BT 3491 मधून प्रवास करीत होते. सदर बस फलटण बसस्थानक सोडल्यानंतर त्यांना झोप लागली होती. काही वेळाने जाग आल्यानंतर त्यांच्या नजरेस दोन्ही सीटच्या मधोमध एक छोटे पाकीट आढळून आले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये रोख रक्कम रुपये ६,०००/- तसेच सोन्याचे असल्याचा संशय असलेले दोन कानातील झुमके असल्याचे दिसून आले.

अशा परिस्थितीत अनेकजण दुर्लक्ष करतात किंवा मोहापोटी सदर वस्तू स्वतःकडे ठेवतात. मात्र सौ. गौरी दाने व श्री. गौरव आसलकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकत्वाचे भान राखत सदर मुद्देमाल बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आणून स्वखुशीने जमा केला. सदर मुद्देमालाचा खरा मालक शोधून त्यास योग्य ती खातरजमा करून परत मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात दिला.

आजही समाजात अशा प्रामाणिक व्यक्ती आहेत म्हणूनच परस्परांतील विश्वास, नैतिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा टिकून आहे. प्रामाणिकपणाचा हा आदर्श इतर नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सौ. गौरी दाने व श्री. गौरव आसलकर यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच समाजातील नागरिकांनी सापडलेली मालमत्ता योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सौ. गौरी दाने व श्री. गौरव आसलकर यांनी दाखविलेली प्रामाणिकता ही केवळ एक कृती नसून समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करणारा एक आदर्श आहे. अशा सजग आणि प्रामाणिक नागरिकांमुळेच समाज अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुसंस्कृत बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बारामती शहर पोलीस स्टेशनतर्फे या दोघांच्या प्रामाणिकपणास मानाचा मुजरा करण्यात येत असून त्यांच्या या कृतीतून समाजातील प्रत्येक नागरिकाने प्रेरणा घ्यावी, हीच अपेक्षा. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें