मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम 915 उद्योगांना दिला लाभ- जिल्हाधिकारी संतोष पाटील

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम 915 उद्योगांना दिला लाभ– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि.1: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्देश हा राज्य शासनाची नवीन उद्योग निर्मिती व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयामार्फत बँकांमार्फत बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास संलग्न अनुदान आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला 673 उद्योगांना कर्जास संलग्न अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते. या तुलनेत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 985 उद्योगांना या योजनेचा लाभ देऊन 136 टक्के उद्दिष्ट पुर्तीकरत सातारा जिल्ह्याने राज्या प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

 माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

 जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांना कर्जास संलग्न अनुदान योजनेच्या लाभासाठी जिल्हा अग्रणी बँकांच्या बैठकीमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत 70 टक्के उद्योग ॲग्रो-फुड आधारित युनिटस आहेत तर सर्व्हीस आधारित यामध्ये ब्युटी पार्लर, झेरॉक्स आदी असे 10 ते 11 टक्के उद्योग आहेत. इंजीनीरींग आधारित 19 ते 20 टक्के उद्योग अन्य 2 टक्के उद्योग आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण 6 हजार 200 अर्ज ऑनलाईन प्राप्त असून हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी विविध बँकांकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50 लाख मर्यादेत व सेवा व्यवसायासाठी 20 लाख रुपये मर्यादेत अर्ज करता येतो. यामध्ये 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण तर 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 उत्तीर्णाची अट आहे. कुठलेही स्थायी उत्पन्न नसले 18 ते 45 वयोगटातील स्थानिक रहिवाशी यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्ष शिथील असणारे पात्र लाभार्थी, वैयक्तीक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्था यांनी मान्यता दिलेले बचत गट असे लाभार्थी पात्र आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal