चाळीसगाव येथे स्थापन झालेल्या आरटीओ कार्यालयाला एक वर्ष पूर्ण

चाळीसगाव येथे स्थापन झालेल्या आरटीओ कार्यालयाला एक वर्ष पूर्ण

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयला दि.७ मार्च रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे. मिल्कसिटी गणित नगरी अशी ओळख मिरविणाऱ्या चाळीसगावच्या मुकुटात एम एच ५२ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव येथे स्थापन झालेल्या या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या एक वर्षात ५८८९ दुचाकी, ४६३ छोट्या चारचाकी, ५४८ शेती ट्रक्टर, १२० मोठी मालवाहतूक वाहने आदी एकूण ७३४४ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच नवीन ३०४६ वाहन चालवण्याचे नवीन परवाने, १४७२ जुन्या परवान्यांचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे. यातून या एक वर्षात चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

यासोबतच वाहनांच्या कामांसाठी जळगाव येथे १०० किमी अंतरावर वाहन धारकांची होणारी फिरफिर आता टळली असून चाळीसगाव येथेच सर्व काम होत असल्याने वाहनधारकांचा वेळ, श्रम, पैसा वाचत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या ३ महिन्यात चाळीसगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर करून आणला. एव्हड्यावरच ते थांबले नाहीत तर मंजुरीनंतर अवघ्या १५ दिवसात दि.७ मार्च २०२४ रोजी आपल्या एम एच ५२ या नव्या ओळखीसह कार्यालय कार्यान्वित करण्याची रेकॉर्ड कामगिरी देखील त्यांनी करून दाखवली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें