8 मार्च, “जागतिक महिला दिनाचे” निमीत्ताने दिनांक 07 मार्च 2025 रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचेकरीता वैद्यकिय आरोग्य शिबीर आयोजित केलेबाबत.

8 मार्च, “जागतिक महिला दिनाचे” निमीत्त सातारा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचेकरीता वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये जनरल चेक अप सह महिलांमधील स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर, आस्थिंचा ठिसूळपणा (Bone Mineral Density) Vit. B12, D-3 या देखील तपासणी करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्याकडे पाहण्याचा महिलांचा स्वत:चा आणि कुटूंबाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा बऱ्याच वेळेस उदासीन असतो. यास्तव मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दल व क्रांतीसिंह नानासाहेब पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा, ऑबस्टेट्रीक ॲन्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटी, जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन सातारा, ( सम्राज्ञी लेडीज विंग ), बोकील मेट्रोपोलिस पॅथॉलॉजिकल लॅबोरटरी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा पोलीस दलातील 410 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकिय आरोग्य तपासणी करणेत आली. –

सदर वैद्यकिय आरोग्य तपासणी शिबीराचे उत्कृष्ट नियोजन मा. पोलीस अधीक्षक, सातारा श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्री अतुल सबनीस, पोलीस कल्याण शाखा यांनी केले. वैद्यकीय तपासणी शिबीराचे उद्घाटन सोहळा मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.राहुल खाडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, क्रांतीसिंह नानासाहेब पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी केली. आभार प्रदर्शन श्री अतुल सबनीस,पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सातारा आणि सूत्रसंचालन सपोनि श्री अभिजीत यादव, वानिशा सातारा यांनी केले.

सदर वैद्यकीय तपासणी शिबीराकरीता ऑबस्टेट्रीक ॲन्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विलास फडतरे, सचिव डॉ. किरण सोनवलकर व इतर गायनॅकोलॉजिस्ट सातारा, जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन सातारा, ( सम्राज्ञी लेडीज विंग ) चे डॉक्टर्स, क्रांतीसिंह नानासाहेब पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथील नर्सिंग स्टाफ, बोकील – मेट्रोपोलिस पॅथॉलॉजिकल लॅबोरटरी सातारा यांचे अमूल्य असे सहकार्य मिळाले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal