लोकशाही दिन केवळ नावालाच काळ्या फिती लावून तक्रारदारांचे आंदोलन कलमाला प्रतीकात्मक फाशी देत प्रशासनाचा निषेध

लोकशाही दिन केवळ नावालाच काळ्या फिती लावून तक्रारदारांचे आंदोलन कलमाला प्रतीकात्मक फाशी देत प्रशासनाचा निषेध

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला लोकशाही दिन चाळीसगावात गेल्या दोन वर्षांपासून केवळ नावापुरताच सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. लोकशाही दिनाच्या अध्यक्षपदापासून ते कामकाजाच्या वेळेपर्यंत शासन निर्णयाचे पालन होत नसल्याचा आरोप करत सोमवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी तक्रारदारांनी चाळीसगाव येथील प्रशासकीय इमारतीबाहेर आंदोलन केले. शासन नियमानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय असलेल्या तालुक्यात लोकशाही दिनाचे अध्यक्षपद प्रांताधिकाऱ्यांकडे असते. मात्र चाळीसगावात या नियमाबाबत दोन वर्षांपासून संभ्रम असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. अखेर तक्रारदारांनी शासन निर्णयाची प्रत अधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून प्रांताधिकारी लोकशाही दिनाचे अध्यक्षपद सांभाळत असल्याचे सांगण्यात आले.

तसेच शासन निर्णयानुसार लोकशाही दिन सकाळी १० वाजता होणे अपेक्षित असताना तो ११ वाजता घेतला जात असल्याचा आक्षेपही तक्रारदारांनी घेतला आहे. याशिवाय सर्व तक्रारदारांना एकत्रितपणे बाजू मांडण्याची संधी न देता एकेक करून दालनात प्रवेश दिला जात असल्याने सामूहिक समस्यांना वाचा फोडण्याची संधी हिरावली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ तक्रारदारांनी तोंडाला व हातांना काळ्या फिती बांधून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कलमाला प्रतीकात्मक फाशी देत ‘जनतेचा लोकशाही दिन की अधिकाऱ्यांचा हुकूमशाही दिन?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला. या आंदोलनात गणेश अग्रवाल, रविंद्र कोष्टी, सागर नागणे, अनिल कुडे, योगेश शिनकर, पवन असलेकर आणि आबासाहेब पाटील सहभागी झाले होते. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी, तक्रारदारांना न्याय मिळावा आणि गेल्या दोन वर्षांच्या लोकशाही दिनाच्या कामकाजाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?