साकेगाव ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

साकेगाव ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

साकेगाव : ग्रुप ग्रामपंचायत साकेगावच्या वतीने दिव्यांग निधीतून गावातील दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक बांधिलकी जपत ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, साकेगाव येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, त्यांना आधार मिळावा आणि समाजातील प्रत्येक घटकाप्रती संवेदनशीलता जपली जावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी करून त्यांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.

या उपक्रमासाठी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रुप ग्रामपंचायत साकेगावचे सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला.

दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal