फलटण प्रांत कार्यालयात ACBची कारवाई; ५० हजारांची लाच घेताना खाजगी एजंट रंगेहात पकडल्याची माहिती
फलटण प्रतिनिधी | एव्हीबी माझा
फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली असून, ५० हजार रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी एजंटला रंगेहात पकडल्याचे समजते.
टाकळवाडी येथील शेतकरी यांच्याकडून संबंधित कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचून कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या कारवाईत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आल्याचे समजते. संबंधित व्यक्तीचे नाव तोडकर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
दरम्यान, या प्रकरणात नेमकी लाच कोणत्या कामासाठी मागण्यात आली होती, या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका आहे का, याबाबत ACBच्या पुढील तपासानंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.













