मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का! शेखरभाऊ गोरे १ सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का! शेखरभाऊ गोरे १ सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

प्रतिनिधी आबासो धायगुडे 

विधानसभेला जयकुमार गोरेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शेखरभाऊंचा आता ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय; माण-खटावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

 सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. १ सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेखरभाऊ गोरे शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

शेखरभाऊ गोरे यांच्या या निर्णयामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना विजयी करण्यासाठी शेखरभाऊ गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता त्यांचाच शिवसेनेत प्रवेश झाल्यास माण-खटावच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता आहे.

‘शब्द’ न पाळल्याने नाराजी?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने शेखरभाऊ गोरे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या नाराजीनंतर शेखरभाऊंनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केल्याचे बोलले जात आहे.

आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या गोटात आणि विशेषतः माण-खटावच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

जयकुमार गोरेंना साथ देणारे शेखरभाऊ आता विरोधी छावणीत!

विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे शेखरभाऊ गोरे आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय मैत्रीचे समीकरण बदलणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेखरभाऊंच्या पक्षप्रवेशामुळे माण आणि खटाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकेकाळी विजयासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले शेखरभाऊ आता वेगळ्या राजकीय वाटेवर निघाल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें