एव्हीबी माझा | विशेष बातमी बालभारती, पुणेकडून इतिहास विषय लेखन समिती सदस्य श्री. ताराचंद नारायण आवळे यांचा सन्मान

 एव्हीबी माझा | विशेष बातमी
बालभारती, पुणेकडून इतिहास विषय लेखन समिती सदस्य श्री. ताराचंद नारायण आवळे यांचा सन्मान

फलटण प्रतिनिधी | 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या वतीने इयत्ता सहावीच्या ‘इतिहास व नागरिकशास्त्र’ विषयाच्या पाठ्यपुस्तक लेखन समितीचे सदस्य श्री. ताराचंद नारायण आवळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या लेखन व संपादन प्रक्रियेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत बालभारतीतर्फे श्री. आवळे यांना योगदानपत्र (भेट-प्रत) तसेच नव्याने प्रकाशित झालेल्या पाठ्यपुस्तकाची प्रत प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी बालभारतीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते श्री. आवळे यांना सन्मानपत्र व पाठ्यपुस्तकाची प्रत प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक योगदानाचे कौतुक करत अभिनंदन केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके तयार करण्यामध्ये योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें