नदी आहे की हिरवे मैदान, चाळीसगाव शहरातील तितूर नदी जलपर्णीच्या विळख्यात, नदी स्वच्छ करण्याची नागकांची मागणी

नदी आहे की हिरवे मैदान, चाळीसगाव शहरातील तितूर नदी जलपर्णीच्या विळख्यात, नदी स्वच्छ करण्याची नागकांची मागणी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

चाळीसगाव शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या डोंगरी-तितूर नदीची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण नदी हिरव्या वनस्पतींनी झाकली गेल्याने ही नदी आहे की हिरवे मैदान, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जलपर्णी ही वेगाने वाढणारी जलवनस्पती असून ती पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी करते. परिणामी जलचर जीवांचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याने नदीतील प्रदूषण वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, जलपर्णीचे प्रमाण वाढल्यास डास आणि इतर रोगकारक कीटकांची पैदास होऊन सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी नियमित मोहीम राबविणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही काळात या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष दिले गेले नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

पावसाळा जवळ येत असताना नदीतील ही जलपर्णी काढणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह मंदावल्यास अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ही जलपर्णी काढून नदी स्वच्छ करण्याची मागणी जोर धरत आहे. नदी संवर्धनासाठी केवळ जलपर्णी काढून चालणार नाही, तर नदीत मिसळणारे सांडपाणी, कचरा आणि प्रदूषणाचे स्रोत रोखण्यासाठीही दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें