साकेगाव येथील ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मंजूर
साकेगाव प्रतिनिधी:
सोमवार दि. २५/०५/२०२६ रोजी जपल्या ग्रामसभेत आपली मराठी शाळा वाचावी या भावनेतून एक ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला, जे पालक आपला पाल्याचे *जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घेईल त्यांना सण २०२६-२७ ची घरपट्टी माफ* करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला, जिल्हा परिषद शाळेविषयी पालकांच्या मनात तयार झालेली उदासीनता व चुकीचे ग्रह दूर करण्यासाठी सदर ठराव हा महत्वपूर्ण ठरत आहे, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विध्यार्थ्यांना उत्तम प्रतिचे शिक्षण मिळेल याची ग्वाही दिली, प्रसंगी सरपंच सौ अलकाताई चंद्रकांत सातपुते, उपसरपंच सौ सुवर्णा संजय तांबे, ग्रामसेवक अडसरे भाऊसाहेब, जि प शाळेच्या मुख्याध्यापिका टेमकर मॅडम, इतर अधिकारी वर्ग, व ग्रामस्थ उपस्थित होते, ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाचे ग्रामस्थांनी तसेच सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वागत करून कौतुक केले.












