“वाढदिवसाचा खर्च गेला प्राण्यांच्या सेवेसाठी; नाशिककरांकडून कौतुक”“प्राण्यांची सेवा हीच मानवता; अमोलभाऊ भागवतांचा समाजाला नवा संदेश”

“वाढदिवसाचा खर्च गेला प्राण्यांच्या सेवेसाठी; नाशिककरांकडून कौतुक”“प्राण्यांची सेवा हीच मानवता; अमोलभाऊ भागवतांचा समाजाला नवा संदेश”

नाशिक

समाजाला नवा आदर्श देणारा उपक्रम नाशिकमध्ये पाहायला मिळाला आहे.

स्वयंसेवक व स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष अमोलभाऊ भागवत आणि स्वाती अमोल भागवत यांनी आपला विवाह वाढदिवस “प्राणिमात्र संगोपन दिन” म्हणून साजरा करत समाजासमोर एक वेगळा संदेश दिला.

पहाटेपासूनच स्वराज्य सोशल फाउंडेशन आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील भटक्या प्राण्यांसाठी अन्न, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था केली.

भटक्या श्वानांना खाद्य वाटप, जनावरांसाठी चारा, तसेच जखमी प्राण्यांसाठी वैद्यकीय साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आले.

यानंतर हा उपक्रम जाणीव बेघर निवारा केंद्र येथे स्नेह सोहळ्याने संपन्न झाला.

यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमातून भटक्या आणि जखमी प्राण्यांसाठी स्वतंत्र पशु काळजी केंद्र उभारण्याची गरज देखील अधोरेखित करण्यात आली.

प्राण्यांची सेवा हीच खरी मानवता असल्याचा संदेश या अनोख्या विवाह वाढदिवसातून देण्यात आला.

🎥 प्रतिनिधी – सचिन देवरे | नाशिक

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें