राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात नव्याने कोणतीही सभासद नोंदणी झालेली नाही, डॉ.विनायक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात नव्याने कोणतीही सभासद नोंदणी झालेली नाही, डॉ.विनायक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

( *चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव*) :-

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेमध्ये सध्या कोणतीही नव्याने सभासद नोंदणी झालेली नसल्याचा स्पष्ट खुलासा संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण यांनी आज 2 रोजी राष्ट्रीय अंधशाळेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची नोंदणी धर्मादाय ट्रस्ट व सहकार कायद्यानुसार करण्यात आलेली असून संस्थेंच्या मंजूर घटनेच्या नियमावली नुसारच सभासद नोंदणी होणे गरजेचे आहे, त्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला असल्याने कार्यकारी मंडळाने कोणतीही सभासद नोंदणीबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप घेतलेला नाही असे स्पष्ट करत दिं. 15 जानेवारी 2026 रोजीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नवीन सभासद निर्णया बाबत फक्त चर्चा झाली. नवीन सभासद नोंदणीच्या निर्णया बाबत संंस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुपचूप सभासद नोंदणींची माहिती कपोकल्पित असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही व्यवसायिक संस्था नसून ती केवळ शैक्षणिक संस्था असल्याने सभासद संख्या वाढल्याने संस्थेचा आर्थिक डोलारा कोसळणार असल्याचेही त्यांनी सविस्तपरपणे माहिती देत सांगितले. संस्थेच्या मंजूर घटनेनुसार नवीन सभासद होण्याबाबत सहकार कायद्यानुसार नियमावली तयार करावी लागते, त्या नियमावलीला कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूरी घेऊन सर्वसाधारण सभेत सभासद नोंदणी नियमावलीला मंजूरी घ्यावी लागते. त्यानंतर ती मंजूरीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवावी लागते हा ऐवढा सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय सभासद नोंदणी करता येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवीन सभासद नोंदणीची प्रक्रिया ही मनमानीपणे नव्हे तर कायद्यानुसार करावी लागते त्यामुळे गुपचुप सभासद नोंदणीचा आरोप हा खोटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, सहसचिव रावसाहेब साळुंखे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. यावेेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें