26 जानेवारी निस्वार्थ मैत्री जपणाऱ्या मित्राचा आज वाढदिवस
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बापु साहेब चौधरी यांचे आज अभिषचिंतन खर तर सुखात कुणीही सोबत असतं पण दुःख आणि वेदनेचा काळ असतांना त्यावर फुंकर घालून आपल्या दुःखात सहभागी होतो तोचं आपला खरा मित्र अशा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे रामेश्वर उर्फ बापू बाबूलाल चौधरी, अध्यात्म आणि वारकरी वृत्ती खरे विठ्ठल भक्त म्हणून परिचित असलेले स्वर्गीय बाबूलाल खंडू चौधरी यांचे कनिष्ठ चिरंजीव असलेलं रामेश्वर चौधरी यांचं सामाजिक योगदान देखील आहे तेली समाज पंच मंडळाचे ते सदस्य आहेत, आणि आपल्या सामजिक कला गुणांनी त्याची समाजात वेगळी ओळख आहे.
दांडगा जनसंपर्क आणि अडीच्या काळात मित्रासाठी धावून जाणारं हे व्यक्तिमत्व मग त्यासाठी आर्थिक झळ सोसायला देखील मागे पुढे बापू कधीच पाहत नाही. त्यांच्याशी भले कुणी कसही वागलं. असेल पण त्याला अडचण असेल तर रामेश्र्वर त्याच्या साठी पुढे आलाच असेल हळव्या मनाचा असलेले हे व्यक्तिमत्त्व. मैत्रीत वाद विवाद नाही ती मैत्री कसली यातच आपली परकी कळत असतात . मैत्रीत वाद तेव्हढ्यापुरता असतो. लागलीच आपुलकी आणि आपल्यासाठी पुढे येतो, तो मित्र म्हणजे रामेश्वर कुणी काही म्हणत असेल, त्याची पर्वा नाही मात्र मित्रासाठी कुठही तमा न बाळगणार माणुसकी जपणारं नात जोपासणारा सन्मित्र म्हणजे रामेश्वर चौधरी अशा या मैत्रीच्या दुनियेतील राजा माणसाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..









