77व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत गणपती बाप्पाचा जयघोष! महाराष्ट्राचा डंका घुमणार‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ – महाराष्ट्राचा भव्य चित्ररथ कर्तव्यपथावर दमदार!
नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२६: गणपती बाप्पा मोरया! यंदाच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा जयघोष घुमणार आहे. ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या थीमवर सज्ज झालेला महाराष्ट्राचा चित्ररथ अवघ्या जगाला राज्याची सांस्कृतिक शक्ती, आर्थिक सामर्थ्य आणि आत्मनिर्भरतेची गाथा सांगणार आहे.गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची अर्थव्यवस्था, हजारो मूर्तिकार-कलाकारांना मिळणारा वर्षभरचा रोजगार, पर्यावरणस्नेही सजावट आणि सामाजिक एकतेची ही उत्सवाची ओळख चित्ररथातून जगासमोर येईल. २०२५ पासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ाचा दर्जा मिळाल्याने हा उत्सव आता फक्त सांस्कृतिक नव्हे, तर आर्थिक व पर्यावरणीय आत्मनिर्भरतेचेही प्रतीक बनला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. अशीष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य सोहळ्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील कुशल कलाकारांना सुनिश्चित संधी मिळाली आहे. खासदार छ. उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांचे आशीर्वाद लाभले असून, पंकज चव्हाण (नगरसेवक, सातारा) यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमचे कलाकार पारंपरिक लेझीम नृत्याने कर्तव्यपथ दणाणणार आहेत. चित्ररथाचे विशेष गाणे बिभिषण चवरे (सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक) यांनी संगीतबद्ध केले आहे.गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
महाराष्ट्राची ही सांस्कृतिक गर्जना आता दिल्लीतून संपूर्ण देशात आणि जगात घुमणार!









