उद्योग रोजगारनिर्मितीसाठी चाळीसगाव येथे १५ हजार कोटींच्या SAF प्रकल्पाला मंजुरी, या प्रकल्पामुळे जवळपास तीन हजार रोजगार निर्मिती होणार, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

उद्योग रोजगारनिर्मितीसाठी चाळीसगाव येथे १५ हजार कोटींच्या SAF प्रकल्पाला मंजुरी, या प्रकल्पामुळे जवळपास तीन हजार रोजगार निर्मिती होणार, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

 

*चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव* :–

दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, महाराष्ट्र शासनाने SAF प्रकल्पासाठी अमेरिका स्थित सॅन फॅन्सीस्को येथील कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार असून, यामुळे तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.

राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला आहे. या प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे अंदाजे १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्याh साहाय्याने ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून Sustainable Aviation Fuel (SAF) तयार केले जाणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

संपूर्ण प्रकल्प 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, BESS सह 24×7 वीज, 100 टक्के पाणी पुनर्वापर, EV ट्रकद्वारे वाहतूक, तसेच ESG (Environment, Social, Governance) निकषांचे पूर्ण पालन केले जाणार आहे. या महाप्रकल्पातून थेट 3000 हून अधिक रोजगार निर्मिती होणार असून, शेतकरी, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि पुरवठा साखळीच्या माध्यमातून हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी माल व कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे. या करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की “आजचा दिवस चाळीसगांव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे, जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच आले असून लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मतदारसंघात काम करत असताना सिंचन, रस्ते, दळणवळण यासोबतचं नवीन उद्योग व त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती तसेच शेतकऱ्यांची उत्पन वाढ व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील होतो. गेल्या वर्षभरापासून याबाबत बोलणी व पाठपुरावा सुरू होता. आज अखेर याचा एक मोठा टप्पा पार झाला असून महाराष्ट्र सरकारने SAF प्रकल्पासाठी ACTUAL HQ आणि Sankla Renewables Pvt. Ltd. या दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. ही फक्त सुरुवात असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें