गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश, मूळ मालकांना केले परत मोबाईल
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चालू वर्षात गहाळ झालेल्या मोबाईलबाबत संबंधित मोबाईलधारकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सायबर पोलिस स्टेशन, जळगाव यांच्या मदतीने हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळविले आहे. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मासिक क्राईम मिटिंगदरम्यान गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलिस यांच्या मदतीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एकूण ११ मोबाईल संच अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये हस्तगत केले आहे. हे मोबाईल मूळ मोबाईलधारकांना परत करण्यात आले. ही कामगिरी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक फोजदार युवराज नाईक, पोलिस हेड कोंस्टेबल संदीप पाटील, पो.कॉ. विजय पाटील, पो.कॉ. बाळू बाविस्कर तसेच सायबर पोलिस स्टेशन जळगाव पोलिस नाईक ईश्वर पाटील, पो.कॉ. गौरव पाटील, पो.कॉ. मिलिंद जाधव आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे.













