घोलप व पवार यांचा खासदार गटात प्रवेश; राजे गटाला पुन्हा धक्का

घोलप व पवार यांचा खासदार गटात प्रवेश; राजे गटाला पुन्हा

फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत दाखल होणारे कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असताना  प्रभाग क्रमांक ८ मधील उमेश घोलप आणि प्रभाग क्रमांक ४ मधील विक्रम पवार यांनी राजे गटाला राम राम ठोकत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडला .

यावेळी भाजप नेते व नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले, माजी नगरसेवक अनुप शहा, अजय माळवे, फिरोज आतार, सनी मांढरे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही  प्रभागातील सक्रिय कार्यकर्ते असलेल्या यांच्या९ सहकार्याने आणि पवार यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटन शक्ती अधिक बळकट झाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले .

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेले दुहेरी गळतीमुळे राजे गटाला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे 

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें