” सेल्फी विथ समस्या ” कय्युम मुल्ला यांचे अनोखे आंदोलन….
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
लोणंद शहरातील पुणे सातारा मुख्य रस्त्यांवरील बसस्थानक समोरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले चौक, शिवशक्ती पेट्रोलपंप समोर दोन , वीर जिवा महाले चौक जुना फलटण रोड, शिवाजी चौक आदी विविध ठिकाणी रस्त्यांचे धावपट्टी ला लागूनच सांडपाणी वाहून जाणारे गटारींचे चेंबर अनेक दिवसांपासून फुटुन काही जागी सिमेंटचे उघडे तर काही जागी वाहनांच्या ओझ्याखाली दबुन लोखंडी चेंबर ची दैयनिय अवस्था झाल्याची पाहावयास मिळत आहे व ते धोकादायक चेंबर अपघातास निमंत्रण देत आहेत तसेच लोणंद शहरांतर्गत अनेक बंदिस्त गटारांची हिच अवस्था झाली असुन त्यांवरिल चेंबर पुर्ण नामशेष होऊन उघडी पडली आहेत हे तुटलेली चेंबर दुर्गंधी बरोबरच धोकादायक होऊ लागली आहेत. यामुळे जिवीत हानी तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार होत आहे.
लोणंद शहरातील विविध प्रकारचे समस्यांना जसे आहे तसे नागरिक, लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांचे निवारण करणे असा लोक हितासाठीचा उद्देश ठेवून या चेंबरचे योग्य रितीने दुरुस्ती तथा आवश्यक प्रतीचे नवीन चेंबर लावण्यासाठी या समस्येला तसेच शहरांतर्गत दुरावस्थेची सुधारणा होणेकामी विविध समस्यांना आनोख्या पद्धतीने वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी ” सेल्फी विथ समस्या ” एक असे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनामध्ये घातकपणे साठलेले कचरा ढिगारे , तुंबलेल्या गटारी, बंदिस्त गटरींचे तुटलेले चेंबर, पाणी वाॅलवरिल तुटलेले चेंबर, रस्त्यांवरील खड्डे, उघड्यावरच मुतारी, शौचालयाची समस्या, भटके श्वान, अपुर्ण रस्ते, ट्रॅफिक जाम आदी विविध समस्यांचे ठिकाणचे एक सेल्फी काढून ते फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आदी विविध सोशल मिडियावर व बातमीपत्रांत प्रसिद्ध करत वाचा फोडणे अशा स्वरूपाचे असुन लोणंद विषयी स्नेह असणारे युवा वर्ग, राजकीय, सामाजिक क्षेत्र व लोणंदच्या सर्व स्तरातील दक्ष नागरिकांनी सहभागी व्हावे व अशा समस्यां सोबत सिल्फी फोटो काढून तो सोशल मिडियावर शेयर करुन निवारण करण्यासाठी गांधीगिरी मार्गाने प्रयत्न करावा असे विनंती आवाहन सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी केले आहे.













