साताऱ्यात संविधान रक्षणासाठी सर्वपक्षीय महामोर्चाचा हुंकार; वकील राकेश तिवारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी दलित समाजाच्या सुरक्षेसाठी बैठक घेण्याची मागणी  

साताऱ्यात संविधान रक्षणासाठी सर्वपक्षीय महामोर्चाचा हुंकार;

वकील राकेश तिवारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

दलित समाजाच्या सुरक्षेसाठी बैठक घेण्याची मागणी  

उमेश लांडगे (सातारा): सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांच्या कृत्याविरोधात सातारा जिल्हा संविधान रक्षणाच्या लढ्यासाठी एकवटला. तिवारी यांनी सरन्यायाधीशांवर बूटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, साताऱ्यातील संविधानप्रेमी संघटना, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून भव्य महामोर्चाचे आयोजन करत तिवारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. संविधान संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. तिवारी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या योग्य कलमांनुसार तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी मोर्चातून करण्यात आली. विशेषतः न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यासोबतच, कोरेगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनेही सातारा जिल्ह्यातील दलित समाजाच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि दलित समाजाच्या सुरक्षेसाठी त्वरित बैठक घेण्याची विनंती केली. “सातारा जिल्ह्यात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे गायकवाड यांनी ठणकावून सांगितले. या महामोर्चात अशोकराव गायकवाड, वर्षाताई देशपांडे, अरुणजी गाडे, संजय गाडे, दादासाहेब ओव्हाळ, गणेश भिसे, चंद्रकांत खंडाईत, सत्यवान कमाने, उमेश खंडजोडे एडवोकेट वाहागावकर, सादिक बागवान, सुरेश कोरडे, अमोल आवळे, रामदास कांबळे, स्वप्नील गायकवाड, युवराज कांबळे, यांच्यासह हजारो संविधानप्रेमींनी संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने आवाज बुलंद केला. हा मोर्चा साताऱ्यातील सामाजिक एकतेचे आणि संविधानावरील निष्ठेचे प्रतीक ठरला. संविधानाच्या रक्षणासाठी सातारा एकवटला, आता कारवाईची प्रतीक्षा!

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal