यंदाचा दसरा व सिमोल्लंघन सोहळा आपत्तीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व पारंपारिक पद्धतीने होणार– पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा प्रतिनिधी : सातारा येथील शाही दसरा महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बैठक आयोजित केली होती. तथापि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विविध ठिकाणी उद्भवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऐतिहासिक शाही विजयादशमी व सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे, असे सांगितले आहे.
या त्यांच्या आवाहनाचा मान राखत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यंदाचा दसरा व व सिमोल्लंघन सोहळा साधेपणाने, पारंपारिक पद्धतीने, पार पाडण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.
Author: AVB Majha
Post Views: 119













