सातारा क्लबची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे धनादेश केला सुपुर्द
सातारा : मराठवाड्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाखाचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपुर्द केला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा क्लबचे सुधीर शिंदे, उपेंद्र पंडित, सुरुची भोसले, अमित कांबळेआदी उपस्थित होते.
मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वती मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असून दानशूर नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी आपआपल्यापरीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.













