साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात– गोरक्ष लोखंडे
सातारा प्रतिनिधी : साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केल्या.
सातारा नगर परिषदेमध्ये झाल्या बैठकीला मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जैव वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असलेल्या रुग्णालयांना नोटीसा काढाव्यात व त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी, अश सूचना करुन श्री. लोखंडे म्हणाले, कंत्राटी कामगारांना किमानवेतन मिळेल याची खबरदारी घ्यावी. तसेच सातारा नगरपरिषदेच्या 22 कामगारांच्या पदनिर्मितीचा शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाची प्रत आयोगाला उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही श्री. लोखंडे यांनी केल्या.













