कृषीपुरक प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आवश्यक – मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

कृषीपुरक प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आवश्यक – मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी:

  फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे कृषी संजीवनी जैविक खते, कीडनाशके उत्पादन प्रकल्प, दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकल्प या विविध कृषी पूरक प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सातारा व सेक्रेटरी, फलटण एजुकेशन सोसायटी, फलटण उपस्थितांना उद्देशून बोलताना कृषीपुरक प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, या कृषीपूरक प्रकल्पद्वारे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसीत करण्यात येणार आहे व विद्यार्थ्यांनी स्वतःचे कृषी उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे तसेच फलटण व परिसरातील शेतकऱ्यांनी या कृषीपूरक प्रकल्पद्वारे उत्पादित कृषी निवीष्ठांचा फायदा घ्यावा व भरघोस शेती उत्पादन घ्यावे असे प्रतिपादन कार्यक्रमासाठी उपस्थितांना केले. कृषीपूरक प्रकल्पामध्ये कृषी संजीवनी जैविक खते व कीडनाशके उत्पादन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक असणारे जैविक खते जसे की असिटोबॅक्टर, स्फूरद विरघळणारे जिवाणू (PSB), पालाश विरघळणारे जिवाणू (KSB), रायझोबियम इ. तसेच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा, जैविक कीडनाशके जसे की मेटारायझियम, बव्हेरिया, व्हर्टीसिलीयम, इ. उत्पादन घेण्यात येणार आहे, दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्पामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थ बनवणे जसे की श्रीखंड, पनीर, बासुंदी असे विविध दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन घेण्यात येणार आहे, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे विविध फळांवर आधारित प्रक्रिया करून जाम, जेली, सिरप, स्क्वॉश, कँडी, याचबरोबर पावडर स्वरूपातील उत्पादने म्हणून जांभूळ पावडर, चिक्कू पावडर, पेरू पावडर इ. उत्पादन घेण्यात येणार आहे. सदरील उद्घाटन प्रसंगी मान्यवर म्हणून श्री. शरदराव रणवरे, व्हाईस चेअरमन, महाविद्यालयिन समिती, श्री. रणजित निंबाळकर, श्री. शिरीषशेठ दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. अरविंद निकम, श्री. सी. डी. पाटिल, डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, प्रा. मनोज शहा, प्रा. सचिन बनकर, प्रा. माधुरी पवार, डॉ. मोहन बंडगर, प्रा. अभय शिंदे, डॉ. रणजित करचे, प्रा. सागर तरटे उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें