बोरी येथे शिष्यवृत्तीधारक 7 विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ.कल्पना राऊत गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
खंडाळा प्रतिनिधी गणेश गुरव
अमरदीप क्रिडा मंडळ बोरी व ग्रामपंचायत बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच सैनिक स्कूल परीक्षेत मिळवलेल्या दैदिप्यमान यशाचा कौतुक सोहळा आयोजित केला.यावेळी शिष्यवृत्तीधारक सात विद्यार्थी व त्यांना उज्वल यश मिळवून देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. कल्पना संदीप राऊत यांना अमरदीप क्रीडा मंडळ बोरी व ग्रामपंचायत बोरी यांच्यामार्फत लिनोवा कंपनीचे आठ टॅब भेट म्हणून देण्यात आले तसेच सन्मानचिन्ह व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय मनोज भाऊ पवार यांनी रुपये पंचवीस हजार किमतीचे ई लर्निंग सॉफ्टवेअर मुलांना बक्षीस म्हणून दिले .
“ध्यास होता या चिमुकल्यांच्या पंखात बळ देण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या चिमुकल्यांनी घेतलेल्या गगनभरारीचा “
अमरदीप क्रीडा मंडळ बोरी ग्रामपंचायत बोरी सर्व ग्रामस्थ व पालक बोरी यांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ,खंडाळा कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र तांबे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड.गजेंद्र मुसळे,बोरी सरपंच महेबूब पठाण,सुखेड माजी सरपंच भिमराव धायगुडे,सुखेड पोलिस पाटील रमेश धायगुडे, संतोष धायगुडे,रामचंद्र धायगुडे आदी मान्यवर,शिक्षक व बोरी व वेळेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.













