प्रेमसंबंधातील खून; ८ तासांत प्रियकर गजाआड  

दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दुपारी १२:०० ते ३:३० वाजेच्या दरम्यान, शिवथर (ता. जि. सातारा) येथील पूजा प्रथमेश जाधव (वय २७, विवाहित) हिचा तिच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून क्रूरपणे खून केला. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४५/२०२५, बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला.  

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांना तपास त्वरित पूर्ण करून आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले. तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धक्कादायक खुलासा केला की, पूजाचा खून तिच्या प्रियकरानेच केला आहे.  

तपासात समोर आले की, पूजा गेल्या सहा वर्षांपासून शिवथरमधील एका २८ वर्षीय व्यक्तीशी अनैतिक प्रेमसंबंधात होती. आरोपीने तिला पळून जाऊन लग्न करण्याचा सातत्याने तगादा लावला होता, परंतु पूजाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिचा गळा दाबला आणि धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून केला. खून करून तो घटनास्थळावरून फरार झाला.  

पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तात्काळ तपास पथके गठित करून आरोपीचा शोध सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पुणे येथील स्वारगेट परिसरात लपून बसल्याचे शोधले. अवघ्या ८ तासांत पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.  

या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी पोलिस ठाण्यात थांबून पथकाला मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीलेश तांबे यांच्या सूचनांनुसार सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सोनू शिंदे, पोलिस हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राउत, सचिन पिसाळ, पोलिस नाईक सतीश बाबर, प्रदीप बाबर, पोलिस शिपाई सुनिल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पांडव, संदीप फणसे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.  

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal