शेतकऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी पाणी अर्ज करावेत.पाण्याचा अनधिकृत वापर करु नये:जलसंपदा विभागाचे आवाहन
सातारा : कोयना नदी व त्यावरील निसरे तांबवे को.प.बंधारे, वांग नदीवरील को.प.बंधारे , तारळी नदीवरील को.प.बंधारे (कृष्णा नदीच्या उंब्रज संगमापर्यंत), उत्तरमांड नदीवरील को.प.बंधारे (कृष्णा नदीच्या उंब्रज संगमापर्यंत),महिंद ल.पा.तलाव व त्यावरील को.प.बंधारे (उत्तरवांग नदीवरील बनपुरी गावापर्यंत), चाळकेवाडी ल.पा., चाफळ ल.पा. व त्यावरील गमेवाडी को.प.बंधारा (उत्तरमांड नदी संगमापर्यंत) ल.पा.तलावाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून कालवा सल्लागार समितीच्या मान्यतेच्या अधिन राहून नियोजन आहे.
मध्यम प्रकल्प / को. प. बंधारे / ल. पा. तलावावर पाणी देण्याचे नियोजन असून, बागायतदारांनी शाखा कार्यालयात पाणी मागणी करणे आवश्यक आहे, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्राधान्याने चारा पिके करावयाची आहेत, या वर्षी खरीप हंगामामध्ये प्रमुख्याने भूसार पिकांना पाणी पुरवठा करण्यात येईल. लाभधारकांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर पिके करावीत. त्यांचे पाणी अर्ज भरुन देवून राष्ट्रीय उत्पनात भर घालावी, या वर्षी खरीप हंगामासाठी नमुना नं. ७अ चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ पुर्वी कार्यालयीन वेळेत देणेत यावेत. या मुदतीनंतर आलेले पाणी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच बागायतदारांनी थकबाकीची रक्कम पुर्ण भरावी. अधिसुचीत नदी, नाले, ओढे, को. प. बंधारे व लघु पाटबंधारे तलावावरील उपसा सिंचन मंजूर धारकांना रब्बी हंगाम भुसार पिकास व को.प. बंधाऱ्यावर ऊस पिकास धरणात पाणी शिल्लक असल्याने मंजुरी देण्यात येणार आहे. त्यांनी ऊस लागण पिकाचे नमुना नं. ७ अ वर पाणी अर्ज ७/१२ उताऱ्यासह संबंधित शाखा कार्यालयात भरुन द्यावेत. ज्यांचेकडे तहसिलदारांचे परवाने आहेत परंतु या कार्यालयाची मंजुरी घेतलेली नाही अशा उपसा सिंचन धारकांना धरणात पाणी शिल्लक असल्यामुळे नमुना-७अ वर ऊस पिकास या हंगामासाठी मंजुरी देणेत येईल, उपसा सिंचन योजनेचे मंजुरी धारक सभासदांना आठमाही मंजुरी असल्याने, परंतु धरणात पाणीसाठा शिल्लक असल्याने खरीप भुसार पिकास व ऊस पिकास या हंगामापुरती नमुना नं ७ अ चे पाणी अर्जावर मंजुरी देणेत येईल, पाणी अर्ज दिला म्हणजे परवानगी मिळाली असे गृहीत धरु नये. तसेच उडाफा क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. आलेली एकूण मागणी व सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी या बाबी विचारात घेवून केलेली मागणी अंशतः अगर पुर्णपणे नामंजुर करण्यात येईल. पाणी अर्जासोबत ७/१२ उतारा जोडावा, लाभधारकांना आवाहन करणेत येते की, पाण्याचा अनाधिकृत वापर करु नये. अनाधिकृत पाणी वापर तसेच पाण्याचा गैरवापर केलेचे निदर्शनास आलेस सिंचन अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करणे भाग पडेल, पासाशिवाय पाणी घेवु नये, बिगर परवाना बिन अर्जी पिकास पाणी घेतल्यास नियमानुसार पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी केली जाईल. पाण्याचे योग्य नियोजन करणेसाठी सर्व लाभधारकांनी मुदतीत पाणी अर्ज देवून सहकार्य करावे. पाणी पुरवठ्यास महाराष्ट्र सिंचन अधिनियम १९७६ कालवे नियम १९३४ तसेच वेळोवेळी काढण्यात येणारे शासकीय आदेश लागू राहतील. पाणी मागणी अर्ज न देणाऱ्या लाभधारकास पाणी मागण्याचा हक्क राहणार नाही, खरीप हंगामात सदर सर्व को.प. बंधाऱ्यामध्ये उपलब्ध पाणी कोट्याच्या अधीन राहून पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे, लाभधारकांना आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अनधिकृत वापर निदर्शनास आल्यास सिंचन अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार कटू कारवाई करणे भाग पडेल, थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे उपसा सिंचन धारकांना पाणी न सोडल्यास अथवा पाणी सोडण्यास विलंब झाल्यास होणाऱ्या नूकसानीची जबाबदारी जलसंपदा खात्याची राहणार नाही, थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम सन १९७६ च्या कलम ४९ अन्वये पाणी पुरवठा बंद केला जाईल, थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम सन १९७६ च्या कलम ५१ (३) व कलम ९७(१) अन्वये विद्युत पुरवठा खंडीत करुन उपसा सिंचनाचे यंत्र (विद्युत मोटार, इंजिन, स्टार्टर इत्यादी) सामुग्रीसह जप्त केले जाईल, थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे थकबाकी रक्कम जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा रुपाने वर्ग करण्यात येईल, वरीलप्रमाणे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यास महाराष्ट्र सिंचन अधिनियम १९७६ अन्वये शासकीय आदेश लागू राहतील, मंजूर उपसा धारक शेतकऱ्यांनी मंजूर करारनाम्याचे अटीत नमुद केले नुसार पाणी उपस मीटर बसविणे बंधनकारक आहे.
तांत्रिक तसेच नैसर्गिक कारणामुळे व लाभधारकांच्या मागणीनुसार आर्वतनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असेही जलसंपदा विभागाने कळविले आहे.













