ज्येष्ठ नागरिकाची शेती करण्याची हौस
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपणा तालुका आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका असून या दुर्गम भागात महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला कोरपणा तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या दुर्गाडी फाट्याजवळ सिताराम गोधूमराम तुमराम ज्येष्ठ नागरिकाची शेती आहे सदर शेती 1972 पासून मिळालेली जमीन असून त्या शेती मध्ये बोरवेल मारून भरपूर पाणी लागल्यामुळे सदर शेतकरी चे दापत्य श्री शत्रुघन सिताराम तुमराम शिक्षक मध्ये एक वेगळा उपक्रम म्हणून चंदन प्लांट राई प्लांट सागवान नारळ केळी इत्यादी बाग या दोन हेक्टर मध्ये शेती करून नियोजनबद्ध प्लान करून येणारे हंगामात सुंदर असं बागायती शेती करीत असल्याचं आपले मत व्यक्त केले सदर शेती मध्ये काय करणार आहे असं परिसरातील शेतकरी तर्कवितर्क करत चर्चा करीत आहे.
——————————-
सर्वत्र जंगलांनी व्यापलेला परिसर असून त्या दगड मातीतच पश्चिम महाराष्ट्रात प्रमाणे पीक घेण्याचा मानस अंगी बाळगला असल्याचे मत शत्रुघन तुमराम शिक्षक यांनी व्यक्त केले.










