मीडियाच्या खोट्या बातम्या: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, काही न्यूज चॅनेल्सनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या, ज्यामुळे खळबळ उडाली. यात भारतीय सेना पाकिस्तानात घुसली, राजौरीत फिदायीन हल्ला, इस्लामाबादवर कब्जा, जम्मू विमानतळावरून जेट्स उड्डाण आणि तोफखान्याचा मारा असे दावे होते. प्रसिद्ध करण्यात आलेले वार्तांकन समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रण यानुसार वार्तांकन होते. समाज माध्यमावरील भ्रामक खात्यावरून माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला.
भारतीय सेनेच्या निवेदनानुसार, हे सर्व खोटे आहे.
भारतीय सैन्य दलाचे निवेदन
भारतीय सेनेच्या ADG PI (
@adgpi
, 9 मे 2025) निवेदनात राजौरीत फिदायीन हल्ल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले. 7 मे 2025 रोजी पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला सेनेने प्रत्युत्तर दिले. सेनेने जनतेला अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
खोट्या बातम्यांमुळे समाजात गोंधळ आणि युद्धाची भीती पसरते. सैनिकांवर मानसिक ताण येऊन मनोबल कमी होऊ शकते.
अफवांचे खंडन करण्यासाठी प्रशासनावर ताण येतो.
युद्धाचे थेट प्रक्षेपण शत्रूला सैन्याच्या हालचाली आणि रणनीतींची माहिती देऊ शकते, ज्यामुळे ऑपरेशनल यशाला धोका निर्माण होतो. यामुळे सैन्य आणि नागरी नुकसान वाढू शकते.
आंतरराष्ट्रीय परिणाम आणि पाकिस्तानला फायदा
खोट्या बातम्यांमुळे भारताची विश्वासार्हता कमी होऊ शकते आणि पाकिस्तान भारताला आक्रमक ठरवून संयुक्त राष्ट्रसंघात सहानुभूती मिळवू शकतो. यामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो.
मीडियावर कारवाई
खोट्या बातम्यांसाठी , प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वे, आणि केबल टेलिव्हिजन कायदा 1995 अंतर्गत कारवाई होऊ शकते.
खोट्या बातम्या आणि थेट प्रक्षेपण राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात. मीडियाने जबाबदारीने वृत्तांकन करावे.
लेखक: उमेश अशोक लांडगे सातारा













