रस्त्याला अढथळा निमार्ण होणाऱ्या अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
दि.६ रोजी चाळीसगाव नगरपरिषदतर्फे अतिक्रमण विरोधी कारवाई अंतर्गत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नगरपालिका हद्दीत रस्त्याला अढथळा निमार्ण होणाऱ्या अतिक्रमणावर नगरपालिके तर्फे काल ६ रोजी दुपारी अचानक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात सार्वजनिक रस्ते, फूटपाथ, बाजारपेठ व इतर सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले,
सदर मोहिम ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, सदर कारवाई ही अतिक्रमण विरोधी पथक, पोलीस प्रशासन व संबंधित विभागांच्या सहकार्याने करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील नंदन दुग्धालय ते भाजी मंडई पुल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यत झालेले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. कारवाई नंतर भाजी मंडई पूलावरील वाहतूक मोकळी झाल्याने वाहतूक धारांना आता मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे, त्यामुळे वाहतूक धार समाधान व्यक्त करत आहे, दरम्यान अतिक्रमण काढल्यानंतर मुख्यधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले की शहरातील नागरी सुविधा सुरळीत राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा शहरात सर्वत्र राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करू नये, केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, शहराच्या स्वच्छतेस व सौंदर्यास जनतेने नगरपालिकेला सहकार्य करावे,













