शिवउद्योग सेनेचे पायलट प्रोजेक्ट राज्यभर राबवणार: अधिकराव जगताप

शिवउद्योग सेनेचे पायलट प्रोजेक्ट राज्यभर राबवणार: अधिकराव जगताप

शिवसेना प्रणित शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून राज्यभरात उद्योजकांसाठी पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहेत.पुणे जिल्ह्यातील शिवसेना प्रणित शिवउद्योग सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल पक्षाच्या कार्यालयात पार पडली.या बैठकीत संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव अधिकराव जगताप यांनी मार्गदर्शन करताना राज्यात राबवण्यात येणाऱ्या पायलट प्रोजेक्टबद्दल माहिती दिली..

या बैठकीत सूक्ष्म व लघुउद्योगात नवीन लोकांना सामावून घेणे. असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायाला चालना देणे. प्रशिक्षीत मनुष्यबळ पुरवणे. बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिला व्यावसायिक निर्माण करणे.महिलांसाठी खाद्यपदार्थ विक्रीसाठी
ई वाहनाची सुविधा निर्माण करून देणे.गोशाळेच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणे. बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवणे आणि ई बाजारपेठ उपलब्ध करून देणे.बेरोजगार तरुणांसाठी वाहनचालक प्रशिक्षण आणि नोकरभरती करणे.यासारख्या विविध योजनांबद्दल सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.
उपस्थीत पदाधिकाऱ्यांना रोजगार निर्मिती संदर्भातील हे पायलट प्रोजेक्ट आपल्या विभागात कशापद्धतीने राबवावे यासंदर्भात विविध क्षेत्रातील जाणकारांनी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजाभाऊ भिलारे,अश्विनी ताई कसबे
यांनी मार्गदर्शन केले.यावेळी वैशाली काटकर,संदीप कीरे,वीणा कामत,अश्विनी कसबे, मनीषा परांडे,परिणिता कारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.महिला शहरप्रमुख वंदना कुमावत यांनी प्रास्ताविक केले तर शहरप्रमुख योगेश खोपडे यांनी आभार मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें