स्व.श्री.नैलेश मेहता जन्मदिनानिमित्त पुनवडी येथे शालेय साहित्य वाटप
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
जावली तालुक्यातील पुनवडी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे दातृत्वशील व्यक्तिमत्व स्व.श्री.नैलेशभाई शांतीलाल मेहता (मालक,महालक्ष्मी मेडिकल स्टोअर्स मुंबई) यांच्या जन्मदिनानिमित्त श्री संतोष पांडुरंग पार्टे, महालक्ष्मी मेडिकल स्टोअर्स मलबार हिल यांच्या सौजन्याने पुनवडी शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक यांना मिष्टान्न भोजन तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी केडंबे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हंबीरराव जगताप साहेब,सरपंच श्री सुरेश पार्टे,श्री.संतोष पार्टे यांच्या मातोश्री श्रीम.गिताबाई पार्टे,SMC अध्यक्षा सौ.कविता पार्टे,उपाध्यक्ष श्री रामचंद्र उंबरकर, तुकाराम पार्टे,बंडू पार्टे, किसन पार्टे, सुरेश साहेबराव पार्टे, अश्विनी पार्टे, मनिषा पार्टे,अश्विनी भिलारे,वाटंबे शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन ठोंबरे सर तसेच ग्रामस्थ,पालक उपस्थित होते. केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप यांनी स्व.नैलेश मेहता यांना प्रथम आदरांजली वाहून संतोष पार्टे करीत असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. श्रीमती गीताबाई पार्टे यांचा यावेळी शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत व आभार मुख्याध्यापक विशाल दळवी यांनी मानले.










