सातारा तालुका पोलीसांनी चोरीला गेलेल्या चार दुचाकी केल्या हस्तगत:- ( सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची दमदार कामगिरी)
सातारा तालुका पोलीस ठाणे दिनांक 18/03/2025 रोजी फिर्यादी सुरज चंद्रकांत चोरट रा . लिंब ता. जि. सातारा यांनी लिंब गावचे हददीतील विमल एन्टरप्रायजेस चे पार्किंगमधुन हिरो कंपनीची स्पेंडर प्लस क्रमांक एमएच 11 सीएन 4413 व दिनांक 15/03/2025 रोजी फिर्यादी हिदायतुल्ला हजु शेख रा. मोळाचा ओढा ता. जि. सातारा यांनी दिव्यनगरी गावचे हददीतील पारटे किराणा दुकानाच्या समोरुन होंडा कंपनीची अॅक्टीवा क्रं एमएच 11 सीएक्स 4094 तसेच सातारा शहर पोलीस ठाणे दिनांक 12/02/2025 रोजी फिर्यादी गजानन रामचंद्र दिक्षीत रा. संगमनगर सातारा यांनी राहते घरासमोरुन बजाज डिस्कव्हर क्रमांक एम 11 बीसी 0385 तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हददीतुन चोरीस गेलेली हिरोहोंडा कंपनीची स्पेलंडर ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन घेऊन गेलेबाबतचा गुन्हे दाखल झाले होते.
, सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्याने सदर चोरीस गेलेले वाहने हे तीन संशयित इसम विक्री करणेस येणार असल्याची गोपनिय माहिती सातारा तालुका पोलीस ठाणेचे डीबी पथकातील पोहवा दादा स्वामी यांना मिळाली होती. सदर माहितीच्या पडताळणी दरम्यान सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी.बी. पथकास मौजे लिंब याठिकाणी तीन संशयित इसमांना 1 दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर इसमाने चार दुचाकी चोरी करुन घेऊन गेलेची कबुली दिल्याने सदर गुन्हयामधील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर मिळुन आलेल्या दुचाकींची 1,10,000/- रू किंमतीच्या असुन सदर चोरीचे गुन्हे सातारा तालुका पोलीसांनी उघड केला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोहवा दादा स्वामी, पोहवा शिखरे, मपोहवा गायकवाड, पोना प्रदिप मोहिते, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ धीरज पारडे यांनी केलेली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.













