आदर्की खुर्द खून प्रकरणातील पसार आरोपीच्या शोधासाठी लोणंद पोलिस यांच्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस .
सातारा प्रतिनिधी- आबासो धायगुडे
आदर्की खुर्द, ता. फलटण गावचे हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणाऱ्या रोडवर आपली बदनामी केल्याचा संशय घेऊन, त्याचा राग मनात धरून दुचाकीला चारचाकी गाडीने धडक देवून खाली पडल्यावर कोयत्याने वार करून रत्नशिव संभाजी निंबाळकर, रा. आदर्की खुर्द यांचा खून केल्याच्या प्रकरणातील फरारी आरोपी दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण याची माहिती देणाऱ्यास लोणंद पोलिसांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
फरारी आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा शोध घेण्यासाठी लोणंद पोलिसांनी विविध पथके तयार केली असून तांत्रिक माहितीच्या आधारेही त्याचा शोध घेण्यात येत आहे. दत्तात्रय निंबाळकर याचे वय ४२ असून उंची ६फूट आहे. रंग सावळा, बांधा मजबूत, वजन ९० किलो आहे. केस फौजी कट तर आर्मीमधून पळून आला आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास लोणंद पोलिसांशी संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येऊन त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी केले आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले तपास करीत आहेत.













