महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर 3 एप्रिल रोजी मतदानpa. l

महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर 3 एप्रिल रोजी मतदान

सातारा दि.1: महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर झालेली असून ही निवडणूक ही प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी गुप्त मतदान पध्दतीने सकाळी 8 ते सायंकाळी 5 घेण्यात येणार आहे. निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सातारा जिल्हयातील मतदान केंद्राचे ठिकाण जिल्हा रुग्णालय सातारा फिल्ड हॉस्पिटल खोली क्रमांक 1 व खोली क्रमांक 2 मध्ये पार पडणार आहे. एकूण 2 मतदान केंद्र आहेत. सातारा जिल्हयात एकूण 1 हजार 884 मतदार असून मतदान केंद्र क्र 1 येथे अनु क्र 1 ते 951 एकूण 951 मतदार व मतदान केंद्र क्र 2 येथे अनु क्र. 952 ते 1 हजार 884 एकूण 933 मतदार जोडण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 करिता दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडे नोंदणी झालेले व सदर नोंदणी नुतणीकरण केलेले वैदयकीय व्यावसायीक हे मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार यादी प्रसिध्द केली आहे.

प्रत्येक मतदाराला 9 मते देण्याचा अधिकार आहे. एकूण 41 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदारांना ओळख पटविण्यासाठीचे दस्तऐवज मतदार यादीत ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असे सर्व वैदयक व्यावसायी व्यक्तीशः मतदान करतील आणि मतदारांची ओळख पटविणे सुकर होण्यासाठी पुढील ओळखपत्रे ग्राहय धरण्यात येतील यामध्ये महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाचे विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या मतदारांसाठी जो ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे अशी छायाचित्रासहित ओळखपत्रे. तसेच नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास संबधीत मतदाराची ओळख पटविण्यासाठी ज्यावर छायाचित्र आहे असे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

  मतदान केंद्रावरील निवडणूक कामकाज होण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी व इतर महसूल कर्मचारी असे एकूण 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय अधिकारी म्हणून डॉ. महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा, समन्वय अधिकारी डॉ. भारती दासवाणी प्राध्यापक औषधशास्र विभाग शासकिय वैदयकीय महाविदयालय, सातारा व सातारा जिल्हयाचे निवडणूकीचे संपूर्ण कामकाज भगवान कांबळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शिल्पा किरण परब निबंधक महाराष्ट्र राज्य दंत परिषद मुंबई हे पाहात आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal