जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड, शाळेचे मुख्याध्यापक, सचिव, आणि क्लार्क यांच्याविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

शहरातील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शाळेचे सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांनी संगनमत करून १५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून ९७ लाख रुपये कपात केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चाळीसगाव पंचायत समितीचे तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई यांनी फिर्याद दिली आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळतात. त्यानुसार, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार अनुदानातून अवैधरीत्या पैसे कपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव), मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड, चाळीसगाव) आणि क्लार्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी मिळून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेतल्या. काही शिक्षकांची कोणतीही परवानगी न घेता आणि शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करत त्यांच्या पगारातून रक्कम कपात करण्यात आली. संपूर्ण गैरव्यवहार २००६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या अशा गैरव्यवहारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal