माजी सैनिकांनी ओळखपत्र तयार करुन घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन
सातारा दि. 6 : जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत आर्थिक मदत व इतर कामकाज ऑनलाईन पद्धतीने ३१ मार्च २०२५ नंतर करण्यात येणार आहे. डिसेंबर २०१९ पूर्वी सेवा निवृत्त 999l, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपीता जिल्हा सैनिक कार्यालय सातारा येथून यांनी ओळखपत्र प्राप्त केले आहे, त्यांनी नवीन ओळखपत्र लवकरात लवकर तया करुन घ्यावे. https://mahasainik.maharashtra.gov.in व www.ksb.gov.in या लिंकवर अर्ज भरून जिल्हा सैनिक कार्यालयात जमा करून नवीन ओळखपत्र तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Author: AVB Majha
Post Views: 150













