बोरी ता खंडाळा येथील शेतकऱ्याचा मुलगा विनोद धायगुडे यांची परदेशात फूड सायन्स विषयात पीएचडी

बोरी ता खंडाळा येथील शेतकऱ्याचा मुलगा विनोद धायगुडे यांची परदेशात फूड सायन्स विषयात पीएचडी

बोरी ता खंडाळा येथील शेतकऱ्याचा मुलगा विनोद धायगुडे यांची परदेशात फूड सायन्स विषयात पीएचडी

स्वप्नं सत्यात उतरतात, जर त्यांना पूर्ण करण्याचा आपण मनापासून प्रयत्न केला तर! ही गोष्ट आहे शिव्या देण्याची प्रथा असलेल्या बोरी गावच्या दोन भावंडांची ज्यांनी आई वडिलांना पासुन दुर राहुन आणि आर्थिक संघर्षाला हरवून युरोप मध्ये संधोधन करुन पीएचडी पदवी पुर्ण करून दाखवलं आहे.

 

किशोर आणि विनोदचे वडील उत्तम धायगुडे आणि आई गीता धायगुडे दोघं कबाडकष्ट करुन शेती करतात, भाजीपाला पिकवुन आठवडे बाजारात विकतात आणि येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरला केला. दोघं अशिक्षीत असूनही त्यांच्या आईवडिलांनी दोन्ही भावंडाचा अभ्यास कधीच थांबवला नाही किंवा त्यांना स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. काही वर्षांनी दोघांना युरोप देशात संधोधन करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. मोठा मुलगा डॅाक्टर किशोर धायगुडे याला २०१९ मध्ये फिनलंड देशातील हेलसिंकी विद्यापिठातुन Bioinformatics विषयात पीएचडी मिळाली होती. २० जानेवारी २०२५ रोजी लहान मुलगा विनोद धायगुडे यांना हंगेरी देशातील हंगेरीन अॅग्रीकल्चर ॲण्ड लाईफ सायन्स विद्यापीठमध्ये बुडापेस्ट विद्यापीठातुन फुड सायन्स विषयात पीएचडी परीक्षा उत्तिर्ण झाला. दोन्ही मुले डॉक्टर झाल्याने परिसरात त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

विनोद धायगुडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, पंचक्रोशी विद्यालय बोरी, माध्यमिक विद्यालय खंडाळा, बॅचलर पदवी एमआयटी महाविद्यालय, पुणे व मास्टर डिग्रीपर्यंत स्लाईट युनिव्हर्सिटी, पंजाब येथे झाले. विनोद धायगुडे यांनी हंगेरीमध्ये बुडापेस्ट ऍग्रीकल्चर अँड लाईफ सायन्स विद्यापीठाणे अन्न विज्ञान विषयात पीएचडी जाहीर केली आहे. त्यांनी अन्न विज्ञान विद्या शाखे अंतर्गत इफेक्ट ऑफ फुल्ली हैड्रोजनेटेड कोकोनट ऑइल ऑन फिसिओ केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन हैड्रोजनेटेड कोकोनट ऑइल या विषयावर शोध प्रबंध सादर केला. २०१५ साली विनोद धायगुडे यांना हंगेरी कृषी आणि जीवशास्त्र विद्यापीठ बुडापेस्ट येथे प्रवेश मिळाला होता. या विषयाला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर लास्लो सोमोग्यी, यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी करत करत विनोद यांनी हंगेरी येथील बायो रिफायनरी मध्ये शास्त्रज्ञ म्हणून ६ वर्षांपासून काम करत आहेत. या पीएचडी प्रवासात त्यांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल मी मोठ्या भाव डॉक्टर किशोर धायगुडे यांचा मनःपूर्वक आभारी आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तुमच्याकडून मला मिळालेल्या सर्व मदत आणि मैत्रीबद्दल विशेष धन्यवाद. या पीएचडीला हंगेरी सरकार आणि टेपस फाउंडेशनकडून अनुदान मिळाले.परदेशातुन अनुभव घेऊन गावी फुड प्रोसेसिंग कंपनी टाकुन शेतकरांचा माल वापरुन नव नविन nutritional food products बनविनाचा विचार आहे. विनोद म्हणाले कि, हा प्रबंध माझ्या चुलते कै.श्री. रामचंद्र विठोबा धायगुडे समर्पित आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें