जगतगुरु संत तुकाराम महाराज व शिव जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
( चाळीसगाव प्रतिनिधी- रणधीर जाधव )
जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील हनुमानवाडी विठ्ठल मंदिर परिसरातील महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तनाला रविवार दि. २६ जानेवारी पासून सुरूवात होत असून २ फेब्रुवारीला या सप्ताहाचे काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार असून त्याच दिवशी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. खान्देश कुणबी मराठा समाज बांधवांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात रविवार दि. २६ रोजी ह.भ.प. मुकुंद महाराज (पहूर) यांच्या किर्तनाने होणार असून सोमवार दि.२७ रोजी ह.भ.प. हिंमत महाराज (टाकळी प्र.चा), मंगळवार दि.२८ रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज (कोळदे), बुधवार दि.२९ रोजी ह.भ.प. नारायण महाराज (अजंदे) गुरूवार दि.३० रोजी ह.भ.प , शरद महाराज (चौकटपाडा), शुक्रवार दि. ३१ रोजी ह.भ. प. रविद्र महाराज (मालेगाव), शनिवार दि.१ रोजी ह.भ.प राजेंद्र महाराज (मुंडवाडी) आणि रविवार दि. २ रोजी ह.भ. प. कृष्णा महाराज (चाळीसगाव) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ वाजे दरम्यान होणार आहे. दररोज कीर्तन हे रात्री ८:३० ते १०:३० यावेळेस कीर्तन होणार आहे, तर काल्याचे किर्तन हे दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजे दरम्यान होईल, कीर्तन झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश कुणबी मराठा समाज बांधवांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.













