उपळवे येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

उपळवे येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी :फलटण उपळवे. दि.२३ बदनामी करण्याची धमकी देऊन मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उपळवे ता. फलटण येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान बंडू जाधव (रा. उपळवे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि. १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपळवे, ता. फलटण गावचे हद्दीत तळ्याच्या शिवारात मयत उमाजी मानसिंग जाधव यांनी संशयित भगवान बंडू जाधव यांचे पत्नीचा हात धरला नसताना तसेच कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले नसताना त्यांची गावात बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. म्हणून शशिकांत उमाजी जाधव यांनी भगवान बंडू जाधव यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें