तरडप येथील वृद्ध लोणंद येथे बसखाली सापडून ठार

तरडफ येथील वृद्ध लोणंद येथे बसखाली सापडून ठार

लोणंद प्रतिनिधी.

लोणंद येथील बसस्थानकासमोरील सातारा पुणे रस्त्यावर एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि २० रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत सोपान महादेव रिटे (वय ७५, रा. तरडफ, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्थानकात झाली नव्हती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, लोणंद बसस्थानकासमोर पुणे-सातारा रस्त्यावर सायंकाळी ७ च्या सुमारास सोपान रिटे हे पायी निघाले होते. यावेळी बसस्थानकातून बाहेर आलेली बस सातारा बाजूकडे जात असताना सोपान रिटे हे बसच्या चाकाखाली सापडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें