अन्यथा मुख्याधिकार्यांच्या कक्षात कचरा फेको आंदोलन करणार, संभाजी सेनेचा इशारा!
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे मुख्यालयी राहत नाहीत कार्यालयीन वेळेतही पूर्णवेळ नसतात अशा अनेकदा दुसरे स्वच्छता निरीक्षक विजय जाधव आणि गोयर हे दोनच लोकं कामे करीत असतात मागच्या काळात काही दिवसांपूर्वी शहरातील शहर विद्रूप करणाऱ्या बॅनर्सचा उत आला होता आणि त्यामुळे शहरातील अत्यंत सोज्वळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व सदानंद चौधरी यांचं अपघाती दुःखद निधन झाले होते, त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने रात्रपहाट करून बॅनर्स काढण्याचे काम सुरू असतानाही स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे कुठेही दिसले नाहीत हे महाशय मुख्यालयी तर राहतच नाही पण कार्यालयीन वेळेतही पूर्णवेळ नसतात आणि अशा लोकांना मुख्याधिकारी हे पाठीशी घालतात असाही आरोप संभाजी सेनेने मुख्याधिकारी यांचेवर निवेदनातून केला आहे आणि अशा गाडेंसारख्या कामचुकार लोकांमुळे जर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर संभाजी सैनिक संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांच्या कक्षात कचरा फेकून आंदोलन करतील असा इशारा संभाजी सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर संभाजी सेना चाळीसगाव शहराध्यक्ष आबा सौंदाणे ,उद्योग विकास आघाडी प्रमुख अविनाश काकडे, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, विद्यार्थी आघाडीचे लक्ष्मण बनकर,
चेतन गवळी, मासूम शहा, पांडुरंग पाटील, राजू शेख, समाधान लोणारी, सोनू कोळी, भैय्या भोसले, आबा झोडगे, सुनील पाटील, नामदेव गोंधळी, विजय कोळी, गणेश देशमुख, मयूर झोडगे, राहुल कोळी, कनक देशमुख, योगेश कोर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.













