मोर्वे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुवर्णा काश्वेद यांची बिनविरोध निवड
खंडाळा प्रतिनिधी :गणेश गुरव
. ता . २४ : मोर्वे ता . खंडाळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सुवर्णा प्रशांत काश्वेद यांची बिनविरोध निवड झाली आहे .
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नरुटे व ग्रामसेविका गोरे यांनी काम पाहिले . सरपंच पदासाठी सुर्वणा काश्वेद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली . या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य लिलावती धायगुडे, अंजली धायगुडे, जयराम पडळकर, अंकुश पडळकर, शारदा धायगुडे व अधिकारी उपस्थित होते .
या निवडी बद्दल ज्ञानेश्वर धायगुडे, अशोक धायगुडे, विक्रम धायगुडे, भरत जाधव, पोलीस पाटील राहुल धायगुडे, गोविंद धायगुडे, मयुर आमते,पोपट गायकवाड, बबन सुतार,संतोष जगताप,विजय गुरव,आकाश धायगुडे,नितीन धायगुडे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .
Author: AVB Majha
Post Views: 144










