भोळी गावच्या उपसरपंच पदी सौ मोनिका अनंत चव्हाण यांची बिनविरोध निवड

भोळी गावच्या उपसरपंच पदी सौ मोनिका अनंत चव्हाण यांची बिनविरोध निवड

खंडाळा प्रतिनिधी: गणेश गुरव 

    खंडाळा तालुक्यातील मौजे भोळी गावचे सुपुत्र अनंत नाना चव्हाण यांच्या पत्नी आणि मोर्वे येथील नथुराम जगताप यांची कन्या सौ मोनिका अनंत चव्हाण यांची भोळी गावच्या उपसरपंच पदी निवड झाली. 

निवडीच्या वेळेस खंडाळा पंचायत समितीचे बोंबले साहेब यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच सरपंच प्रशांत खुंटे माजी उपसरपंच महेश चव्हाण, वंदना चव्हाण, पद्मा चव्हाण, गोरख चव्हाण नीलम चव्हाण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

मा. सभापती श्री मकरंद मोटे, शरद खुटे अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी खंडाळा तालुका , प्रशांत चव्हाण उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे खंडाळा तालुका, सुधीर चव्हाण शाखाप्रमुख शिवसेना भोळी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण माजी उपसरपंच डॉ.हेमंत चव्हाण महेंद्र चव्हाण भरत चव्हाण तंटामुक्ती उपाध्यक्ष, शिवाजी चव्हाण विकास सेवा सोसायटी, भोळी मधुकर चव्हाण दिलीप चव्हाण अमोल चव्हाण, श्यामसुद्दीन शेख मान्यवर उपस्थित होते शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्य ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच मोनिका चव्हाण यांचे खासदार उदयनराजे भोसले, नितीनकाका पाटील, मंत्री मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले,जयकुमार गोरे, ग्रामस्थ भोळी, ग्रामस्थ मोर्वे यांनी अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें