हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे निघाली हजरत पिर मुसा कादरी बाबांची तलवार मिरवणूक

हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे निघाली हजरत पिर मुसा कादरी बाबांची तलवार मिरवणूक

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

येथील हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतिक असलेले हजरत पिर मुसा कादरी बाब यांचा ७२८ वा उर्स काल दि. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता तलवार मिरवणूक निघाली, शहरातील जुनी नगरपालिका जवळील भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थाना पासून बाजार पेठ, पाटणादेवी रोड टावून हॉल मार्गी ही तलवार मिरवणूक दर्गा पर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत चालली, तलवार शरीफ हि परंपरा नुसार सालाबाद प्रमाणे देशमुख यांच्या घरातून निघते तर संदल हे मुस्लिमांच्या घरातून निघते हा इतिहास ७२७ वर्षांपासून आजपर्यंत कायम आहे. दरवर्षी तलवार पकडण्याचे मानकरी देशमुख कुटूंबातून वेगवेगळे असतात, यावर्षी हजरत पिर मुसा कादरी बाबांची तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळाला तर धुनी पकडण्याचा मान सार्थक देशमुख यांना मिळाला, या तलवार मिरवणुकीत दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कान्या कोपऱ्यातून भाविक आले होते, चाळीसगाव शहर पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवलेला होता, दर्गा ट्रस्टी जमील मुजावर, बशीर मुजावर, फकिरा मुजावर, मु्फिद मुजावर यांनी दर्गा येथे सेवा बजावली होती, यावेळी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँक संचालक प्रदिप देशमुख, डॉ नरेश देशमुख, मेडिकल असोसिएशनचे प्रदिप देशमुख, हाजी गफूर पहेलवान, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक रोशन जाधव, शेख अल्लाउद्दीन, मुराद पटेल, फकिरा मिर्झा, अस्लम मिर्झा, वसीम चेअरमन, लतीफ खान, पप्पू राजपूत, व्यापारी निलेश सराफ यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडीशनल एस पी कविता नेरकर, डी वाय एस पी राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, गोपनीय शाखेचे पंढरीनाथ पवार, भटू पाटील, एस आर पी एफ पोलीस व पोलीस अधिकारी कर्मचारी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें