जिल्हा पोलीस दलातर्फे चाळीसगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने चाळीसगाव शहरात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि. 31 रोजी करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना भरती प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंगेश चव्हाण, जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, विजयकुमार ठाकरवाड, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या सह जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचीही उपस्थिती होती. शिबिरामध्ये पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक तयारी तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारी विविध कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस भरती प्रक्रियेची माहिती देऊन उमेदवारांनी योग्य नियोजन, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर भरतीसाठी तयारी करावी, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला सुमारे ५०० ते ६०० तरुण व नागरिक उपस्थित होते. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांना भरती प्रक्रियेची सविस्तरउपस्थित होते. याशिवाय माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उपयुक्त ठरले.













