जामनेर हादरले! चाकू हल्ल्यात गंभीर जखमी किशोर बाविस्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर हादरले! चाकू हल्ल्यात गंभीर जखमी किशोर बाविस्कर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू
बाळू वाघ
जामनेर : काही दिवसांपूर्वी मंडळाच्या हिशोबावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किशोर बाविस्कर यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर आता युवकाच्या मृत्यूमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें